विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिली नवी दिशा – अंतरंग फाउंडेशनचा करिअर मार्गदर्शन उपक्रम ठरला यशस्वी

Whatsapp image 2025 06 04 at 6.33.56 pm (1)

टिटवाळा, प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांची करिअरची दिशा निश्चित व्हावी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यास हातभार लागू यासाठी कार्यरत असलेल्या अंतरंग फाउंडेशनने भिवंडी, अंबिवली, टिटवाळा आणि ठाणे परिसरातील शाळांमध्ये आयोजित केलेल्या Career Aware आणि Career Ready या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षणासोबत योग्य दिशा देण्याचे उद्दिष्ट बाळगून या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

२०१३ साली प्रिया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही संस्था “Every young person is productively engaged” या ध्येयाने प्रेरित होऊन हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे. ‘Career Aware’ अंतर्गत ४० हून अधिक करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली, तर ‘Career Ready’ सत्रांमधून मुलाखत कौशल्य, संवादकौशल्य, रिझ्युमे लेखन, निर्णयक्षमता यांसारख्या व्यावहारिक बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना हे सत्र समर्पित पद्धतीने पोहोचवण्यात आले. अल्हिदाया पब्लिक स्कूल, गणेश विद्यालय, जानकी विद्यालय, मोमिन गर्ल्स हायस्कूल, यशोदीप विद्यालय, कमलादेवी पब्लिक स्कूल, सिद्धार्थ विद्यालय यांसारख्या १५ शाळांमध्ये या सत्रांचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मयुरेश जगताप (सुविधादाता व सहाय्यक व्यवस्थापक) आणि सुनील सिंग (कार्यक्रम सहयोगी) यांनी शाळांशी समन्वय साधून वेळेवर व नियोजनबद्ध सत्र पार पाडण्याचे कार्य समर्थपणे पार पाडले. त्यांच्या समर्पणातून विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती आणि आत्मविश्वास पोहोचवण्यात यश आले.

कार्यक्रमात केवळ मार्गदर्शन सत्र नव्हे, तर व्यक्तिगत समुपदेशन, तज्ज्ञांशी संवाद, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण, पालक सत्र यांचा समावेश होता. शाळा, शिक्षक आणि पालकांकडूनही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात या उपक्रमाने मोलाची भूमिका बजावली आहे. अंतरंग फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ मार्गदर्शन नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले असून शिक्षणासोबत जीवनाला दिशा देणारा प्रभावी पूरक ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *