कल्याण : केवळ आपल्यापुरते न जगता समाजासाठी देखील आपल्याला जगता आले पाहिजे . या उद्दात्त हेतूने कल्याण येथील अपर्णा शिंगटे (नाईक ) यांनी आपल्या संपर्कातील समविचारी महिलांना एकत्र घेऊन आधार फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे . या संस्थेच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच कल्याण येथील बेतूरकर पाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ पातकर आणि माजी नगरसेविका वैशाली भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला .
समाजातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आजही अनेक महिला या घरातील कामापुरतेच मर्यादित आहेत , अनेक गुणवत्ता असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना ईच्छा असूनही आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येत नाही . म्हणूनच अश्या स्त्रियांसाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून अश्या महिलांना उभारी द्यावी या हेतूने आधार फाऊंडेशन संस्थेची स्थापना झाली असल्याचे यावेळी संस्थेच्या संस्थापिका शिंगटे यांनी सांगितले . त्याचबरोबर वस्तीशाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांचे देखील भवितव्य उज्वल व्हावे यासाठी देखील आधार फाऊंडेशन कार्य करणार आहे. तर रेड लाईट परिसरातील स्त्रियांसाठी तसेच त्यांच्या मुलांसाठी देखील विविध उपक्रमाच्या मध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल असे यावेळी सांगण्यात आले .
विविध स्नाजिक उपक्रमात सदैव सक्रीय असलेल्या अपर्णा शिंगटे यांच्या संस्थेला अनेक मान्यवरांनी भेटी देत सदिच्छा देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आधार फाऊंडेशनच्या सोनाली शिंगटे, मनिषा भंजरी,कांचन भोसले, अंबादास शिंगटे, सपना कहार, शिला दातखिळे,मिराबाई जिरेमाळी, सुनंदा पाटील यांसह परिसरातील महीला उस्फुर्तपणे मोठ्या संखेने उपस्थित होत्या .
–
















Leave a Reply