जन जागृती नवयुग संस्थेकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गौळवाडी शाळेतील मुलांना वह्या व खाऊ वाटप

Whatsapp Image 2025 01 26 At 6.31.55 Pm

कर्जत प्रतिनिधी, नितीन पारधी

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौळवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रध्वज तेथील मुख्याध्यापिका अर्चना विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते फडकविण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री. सचिन सब्बन (सहायक लेख अधिकारी, वित्त विभाग) यांची निवड करण्यात आली.
उपस्थित पाहुणे यांचे शाल व पुष्पगुच्छ देत गौलवाडी शाळा व ग्रामस्थ यांस कडून स्वागत करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद शाळा गौळवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत भाषणे करून तसेच गीत सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. गौळवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भाषणात जनजागृती नवयुग संस्था (अखंड भारतीय मानवाधिकार विकल्प) यांचे आभार मानले त्यानंतर मुलांना शिक्षण क्रीडा व कला या गुणांना शाबासकीची थाप देण्यासाठी, विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
जनजागृती नवयुग संस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच तेथील विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट वेफर्स समोसा जिलेबी असा नाष्टा वाटप करण्यात आले. वह्या व खाऊ वाटप केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण तयार झाले होते.

यावेळी तेथे श्री. सचिन सब्बन (सहायक लेखा अधिकारी वित्त विभाग) तसेच (गव्हर्मेंट प्रेस चे सहाय्यक संचालक) श्री. सुदाम मदगे,(जनजागृती संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख) श्री. संतोष मयेकर, (संस्थेचे खजिनदार) श्री .स्वप्निल मधुकर मयेकर, (नायब तहसीलदार) श्री. बोरसे साहेब, (संस्थेचे सरचिटणीस , रायगड मावळ कामगार लीडर)श्री.अमोल भागवत व जनजागृती नवयुग संस्था संपूर्ण टीम, तसेच विशेष सहकार्य दत्तात्रय गायकवाड श्री वसंत पिंगळे श्री मसने श्री समीर ठाकरे वैभव पिंगळे अशोक गाडे शिवाजी राऊत शंकर शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *