अखेर टिटवाळा रेल्वे स्थानकातली लिफ्ट प्रवाशांसाठी खुली

Whatsapp Image 2025 01 09 At 8.22.04 Pm

टिटवाळा : बहुप्रतिक्षेत असलेल्या टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या 1/2 फलाटावरील लिफ्ट अखेर प्रवाशांच्या सोयीसाठी कुली करण्यात आली असून टिटवाळा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे . लिफ्ट सुरु झाल्याने प्रवासी वर्गातून टिटवाळा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे आभार मानत समाधान व्यक्त करण्यात येत आहे .टिटवाळा रेल्वे स्थानकात असलेल्या समस्यांबाबत , त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या विविध अडचणी आणि सोयी-सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने टिटवाळा रेल्वे स्टेशन सल्लागार समिती आणि रेल्वे प्रशासकीय अधिकारी यांच्यात डिसेंबर महिन्यात बैठक झाली होती . या बैठकिला रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत प्लॅटफॉर्म क्र. २ वरील लिफ्ट सुरु केली आहे .

स्टेशन परिसरातील वाहन कोंडीमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे समितीने सुचवले. होते. प्लॅटफॉर्म क्र. २ वरील लिफ्ट लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत समितीच्यावतीने काम वेळेत न झाल्यास साखळी उपोषण करेल, असा इशारा बैठकीदरम्यान की निवेदनाद्वारे देण्यात आला होता याची दखल घेत लिफ्ट सुरु करण्यात आली आहे.श्री महागणपती देवस्थानामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेले टिटवाळा मध्य रेल्वे मार्गावरील प्रसिद्ध असे स्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजच्या प्रवासी वर्गासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते . मात्र त्या मानाने या स्थानकात असलेल्या सोयी सुविधा या तितक्याश्या पुरेश्या नाहीत , वारंवार बंद होणारे सरकते जिने , अपुरी आसन व्यवस्था यांसारख्या विविध समस्या या स्थानकात आहेत त्यातील लिफ्टचा प्रश्न नार्गी लागला आहे.

याबाबत टिटवाळा येथील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या आणि सोयी-सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने टिटवाळा रेल्वे स्टेशन सल्लागार समिती ही रेल्वे प्रशासनाला वारंवार या बाबी बैठक आणि निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत असते . प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येत असते . यापुढे देखील आपण प्रवाश्यांच्या विविध मागण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे यावेळी टिटवाळा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मुंबईकडे जाणारी पहिली लोकल सुरू करणे, सकाळी 8.19 ते 8.54 या वेळेत एसी लोकलनंतर टिटवाळ्यातून एक अतिरिक्त लोकल सोडणे आणि सकाळ-संध्याकाळच्या वेळेत मालगाड्यांना प्राधान्य न देता उपनगरीय गाड्यांना वेळेवर सोडणे यांचा समावेश आहे. याशिवाय स्टेशनवरील आसन व्यवस्था, फॅन्स आणि ट्यूबलाइटची संख्या वाढवणे, आरक्षण खिडकीचे वेळ वाढवणे, पार्किंग शुल्क कमी करणे, स्टेशन परिसरातील वाहन कोंडीवर उपाययोजना तसेच कसारा एंडच्या ब्रिजवर पोलीस आणि आरपीएफची गस्त वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागण्या देखील लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आशा समितीने व्यक्त केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *