टिटवाळा, वार्ताहर : शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने पारंपरिक वारसा आणि शिवकालीन इतिहास जपण्यासाठी “भव्य गड किल्ले बनविणे स्पर्धा २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिश्रम, सर्जनशीलता आणि ऐतिहासिक अचूकता या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.
स्पर्धेत चामर्स शिलेदार (पन्हाळा गड) यांनी ६७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर राज किस्मतराव (अर्जुन्य तारा) यांनी ५१ गुणांसह द्वितीय, आणि महीन पालांडे (रायगड) यांनी ५० गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
रक्तांत असोळकर (राजगड), तिरुपती बालाजी नगर रेंडे (सिंधुदुर्ग), शिवभूमी मित्रमंडळ (रायगड), ओम देशमुख (रायगड), ओमकारेश्वर चाल (रायगड), रोहित जाधव (शिवनेरी), शादुल-मानस-क्षितिज (शिवनेरी) आणि पियुष जाधव (सिंहगड) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत विशेष कौतुक प्राप्त केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी युवासेना शहर सचिव महेश रेखा धोंडू एगडे यांनी पुढाकार घेतला होता. विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व सहभागींच्या उत्साहाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी “जय शिवराय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.













Leave a Reply