अनेक वर्षे बंद असलेल्या एसटी गाडीच्या फेऱ्या वाढणार… जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
कर्जत,प्रतनिधी, नितीन पारधी
रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे निमित्ताने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे सायंकाळी साडे पाच वाजता कर्जत तालुक्यातील आदिवासी वाडी मध्ये पोहचले.येथील आदिवासी लोकांशी संवाद साधला तर चाफेवाडी येथे स्थानिक आदिवासी लोकांनी आपली नेहमीची एसटी गाडीच्या फेऱ्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार केली.त्यावेळी जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधत नांदगाव खांडस एसटी गाडी सुरू करण्याची सूचना रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान तसेच आदि कर्मयोगी अभियान चे आदि सेवा सप्ताह साजरा केला जात आहे.त्याचवेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात आहे.या अभियानांचे निमित्ताने कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी आणि खांडस ग्रामपंचायत मधील चाफेवाडी येथे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेटी दिल्या.पनवेल महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या कामामुळे दिवसभर व्यस्त असलेले रायगड जिल्हाधिकारी यांचे पनवेल येथील काम साडेचार वाजता पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अलिबाग येथे न जाता कर्जत येथे आपली वाहने वळवली.कर्जत शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडवाडी येथे जिल्हाधिकारी यांच्या वाहनांचा ताफा पोहचला.आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे,तसेच तालुक्याचे तहसीलदार डॉ धनजंय जाधव,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन गुरव यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी हे ताडवाडी येथे पोहचले.रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदिवासी भागातील भेटीचे स्वागत स्थगित जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम तालावर स्वागत केले.ताडवाडी गावातील समाज मंदिरात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वन पट्टे आदिवासी ग्रामस्थांना मिळाले आहेत,त्या ठिकाणी बांबू लागवड केली पाहिजे.तर महिलांच्या बचत गटांना फिरते अनुदान देण्यास कोणत्याही अडचणी नाहीत.या ठिकाणी पाथरज ग्रामपंचायत मधील आदिवासी ग्रामस्थांनी कोणत्याही योजना राबविण्यात अडथळे निर्माण होत असतील तर आपल्याला कळवा असे आवाहन केले.स्थानिक ग्रामस्थ सुरेश दरवडा तसेच सुभाष सराई,विमल आगीवले,येसूबाई कांबडी अनेक ग्रामस्थांनी आपल्या वाड्या मधील समस्या जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातल्या.
चाफेवाडी मध्ये जिल्हाधिकारी स्थानिकांच्या मदतीला..
खांडस ग्रामपंचायत मधील चाफेवाडी या आदिवासी लोकांची 100 टक्के वस्ती असलेल्या गावामध्ये रायगड जिल्हाधिकारी यांचा ताफा सात वाजता पोहचला.तेथे स्थानिकांनी आपल्या कडे येणारी एसटी गाडीची केवळ एकच फेरी दिवसातून येते.एसटी गाड्या येत नसल्याने स्थानिकांना अधिक खर्च करावा लागत आहे.त्यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्याचे वाहतूक नियंत्रक यांना संपर्क केला आणि खांडस नांदगाव साठी एसटी गाडी सुरू करण्याची सूचना दिली.सोमवार पासून या मार्गावर आणखी तीन फेऱ्या सुरू होणार असल्याचे जाहीर केले. जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाने स्थानिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.













Leave a Reply